English  |  मराठी 
 
     
  अल्पपरिचय  
  हेमंत लागवणकर  
  (M.Sc., B.Ed.)
(विज्ञान प्रसारक आणि शैक्षणिक सल्लागार)
 
     
  विज्ञानविषयक ४६ पुस्तकांचे लेखन.  
  मा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या उत्तम पुस्तकांच्या यादीत ५ पुस्तकांचा समावेश.
 
  विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांमधून ११०० पेक्षा अधिक विज्ञानविषयक लेख प्रकाशित.  
  २०१२ पासून महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रम विकसन मंडळाच्या विज्ञान विषयगटाचे सदस्य.  
  २०२० ते २०२५ या कालावधीत रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, लंडन यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या विज्ञान शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून कार्यरत. या प्रशिक्षण कार्यक्रमातून १७२ बॅचेसमधून ५३०० पेक्षा अधिक शिक्षकांना प्रशिक्षित केले.  
  राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील सुमारे १४ हजार माध्यमिक विज्ञान शिक्षकांना २०१५ - १६ आणि २०१७ - १८ या वर्षांत महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्ती.  
  महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळात लेखक आणि तज्ज्ञ समीक्षक म्हणून सहभाग.  
  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) या जगातल्या सर्वात मोठ्या दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या 'डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन' या अभ्यासक्रमाच्या लेखक मंडळात सहभाग.  
  २०१२ ते २०२१ या कालावधीत मराठी विज्ञान परिषदेच्या 'पत्रिका' या विज्ञानविषयक मासिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य.  
  आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या २७५ पेक्षा अधिक विज्ञानविषयक कार्यक्रमांमध्ये १९८९ सालापासून लेखन, निर्मिती आणि निवेदन यांमध्ये सहभाग.  
  दूरदर्शनच्या 'बालचित्रवाणी' या शैक्षणिक कार्यक्रमासाठी विज्ञानविषयक अनेक कार्यक्रमांचे पटकथा लेखन आणि सादरीकरणामध्ये सहभाग. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरील विज्ञानविषयक ६ मालिकांसाठी तज्ज्ञ समीक्षक म्हणून कार्य.  
  विज्ञानविषयक २४ ऑडियो-व्हिज्युअल मल्टीमिडिया सीडींसाठी लेखन.  
  भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत २००० सालापासून राष्ट्रीय स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक व परीक्षक म्हणून कार्यरत.  
  कृतीप्रधान विज्ञान शिक्षण, विज्ञान शिक्षणातील ज्ञानरचनावाद, विज्ञान प्रकल्प यांसारख्या विषयांवर १२५ पेक्षा अधिक भाषणे आणि ७५० पेक्षा अधिक शिक्षक प्रशिक्षणांमधून तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग.  
     
  सन्मान आणि पुरस्कार :  
  भारत सरकारतर्फे विज्ञान प्रसाराच्या कार्यासाठी देण्यात येणारा देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार (२०१३ सालचा) २८ फेब्रुवारी २०१४ रोजी प्राप्त.  
  विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल २०११ साली भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित.  
  विविध माध्यमांतून केलेल्या विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेचा २०१२ सालचा मनोरमाबाई आपटे पुरस्कार प्राप्त.  
  विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल २०१२ साली 'आदर्श डोंबिवलीकर' पुरस्काराने सन्मानित.  
  २०१४ साली रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी तर्फे 'रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड' ने सन्मानित.  
  राष्ट्रीय स्तरावर केलेल्या विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल वि. ग. वझे महाविद्यालय, मुलुंड यांच्यातर्फे २०१७ - १८ च्या माजी विद्यार्थी गौरव पुरस्काराने सन्मानित.